HISTORY -

हिंगोली जिल्हाचा इतिहास –

हिंगोली जिल्हा इतिहास सर्वागीण प्रयत्नामुळे परभणी जिल्हाचे विभाजन होऊन १ में १९९९ रोजी हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्यांनी समाविष्ठ असलेल्या हिंगोली जिल्याची निर्मिती झाली. हिगोली जिल्याचे क्षेत्रफळ ४६,३३३ चौरस किमी असून यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नांदेड, जालना, परभणी या जिल्ह्यांनी वेधलेल्या आहे. समुद्रसपाटी पासून ४५० ते ५५० मीटर उंचीवर असलेल्या या जिल्ह्याचा परिसर अजिंठ्याच्या डोंगररागांनी व्याप्त असून सरासरी ८९० मिमी. पर्जन्यमान असलेल्या या जिल्ह्यात कयाधू, पूर्णा, पैनगंगा व आसना या नद्या असून यापैकी कयाधू या नदीचे मुळ नाव कायाधू (शरीरस्वचछ करणारी ) असून तिच्यात विसर्जन करण्यात आलेल्या अस्थि नदीच्या पाण्यात विरघळतात. अशी या परिसरातील भावीकांची श्रद्धा आहे. १९३६ पर्यंत हिंगोली जिल्ह्याचा समावेश वाशीम जिल्यातील नर्सी या परगण्यात होत होता. सतवाहक, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव या वैभवशाली हिंदु राजवाटांनी व त्या नंतर खिलजी, तुघलक, बहामनी, इमाद्शाही, निजामशाही, असिफशाही या घराण्यांनी या भागावर राज्य केले, हैदराबादचा निजाम व ब्रिटीश यांच्या राज्याच्या सीमा हिंगोली जिल्ह्यात परस्परांना स्पर्श करीत असल्याने या शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात तसेच पहिल्या जागतिक महायुद्धात या परिसरातील जवानांनी भाग घेतल्याचे उल्लेख आढळून येतात गुरुनानक दक्षिण भारताचे दौऱ्यावर आले असताना त्यांनी संत नामदेवांच्या नर्सी या जन्मस्थळाला भेट दिली होती. आज तेथे शिखांचा भव्य, देखना व पवित्र गुरुव्दारा आहे. भारतात १२ ज्योतिर्लिंगापैकी एंक असलेले श्री औंढा नागनाथ येथील यादव कालीन हेमाडपंथी मंदिर शिल्पकलेचा एंक उत्कृष्ठ नमुना आहे. शिरडशहापूर या जैनांच्या पवित्र तीर्थ क्षेत्रातील जैन तीर्थंकर शांतीनाथाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील केशी राजांची मंदिर, नर्सी, घोटा, पुसेगाव येथील मंदिरे, वारंगा येथील महादेवाचे मंदिर, येळेगाव तुकाराम येथील तुकाराम महाराजांचा व हिंगोलीत खाकीबाबा मठ यामुळे या संपूर्ण जिल्हाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. हिंगोली येथील सिरेहक शहाबाबा दर्गा, कळमनुरी येथील नुरी बाबा दर्गा, हिंगोली येथील चर्च प्रसिद्ध आहे. हिंगोलीचा दसरा महोत्सव साऱ्या भारतात प्रसिद्ध आहे. रेल्वे व रस्ते यांनी राज्यातील व देशातील प्रमुख शहरांना जोडल्या गेलेल्या शौक्षणीक, सांस्कृतीक, क्रीडा क्षेत्रातील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारया व सर्व धर्म समभावाचे सुंदर प्रतिक असलेल्या या जिल्हाला सुजान व भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्यांची, समाजसुधारकांची व कुशल सरकारी अधिकारी यांची परंपरा लाभल्याने या जिल्याचा भविष्यकाळ उज्जल आहे.

Aundha Nagnath Temple

Narsi Namdeo Temple